Friday, August 14, 2026
Home Gadchiroli एटापल्लीतील कोठी – कोरनार पूल 3 वर्षांतच खचला, हा शासनाचा चंदा की...

एटापल्लीतील कोठी – कोरनार पूल 3 वर्षांतच खचला, हा शासनाचा चंदा की कंत्राटदाराचा धंदा ? – प्रा.प्रशांत देव्हारे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी,गडचिरोली

0
14

एटापल्लीतील कोठी – कोरनार पूल 3 वर्षांतच खचला,हा शासनाचा चंदा की कंत्राटदाराचा धंदा ? – प्रा.प्रशांत देव्हारे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी,गडचिरोली

सुकदर्शन वृतांत
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील कोठी-कोरनार पूल तत्कालीन पालकमंत्री तथा सध्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठ्या थाटात उद्घाटन करून अवघ्या तीन वर्षांतच कोसळल्याने गडचिरोली जिल्ह्यातील विकासकामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या घटनेबाबत ” वंचित बहुजन आघाडी, गडचिरोली ” चे जिल्हाध्यक्ष प्रा.प्रशांत देव्हारे यांनी सरकारवर तीव्र टीका केली आहे.
प्रा.प्रशांत देव्हारे म्हणाले, ” हा शासनाचा चंदा आहे की कंत्राटदाराचा धंदा? हा जनतेच्या पैशाचा विकास आहे की निकृष्ट दर्जाच्या कामांचा धंदा ? “
” कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेला पूल तीन वर्षांतच पाण्यात वाहून जातो.याचा अर्थ स्पष्ट आहे – कामात प्रचंड भ्रष्टाचार आणि निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले आहे. गडचिरोलीच्या नावाने निधी येतो आणि तो लुटला जातो. “
ते पुढे म्हणाले की, ” हा पूल अनेक आदिवासी गावांची जीवनवाहिनी आहे. पावसाळ्यात संपर्क तुटल्याने रुग्ण, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. सरकारने विकासाची मोठी ढोल बडवली,पण प्रत्यक्षात जनतेला मिळाले ते निकृष्ट दर्जाचे काम. “

वंचित बहुजन आघाडीच्या मागण्या : – 

1. कोठी-कोरनार पुलाच्या बांधकामाची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करावी.
2. जबाबदार कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत. 
3. युद्धपातळीवर दर्जेदार नवीन पूल बांधून जनतेला दिलासा द्यावा.
” जनतेच्या पैशाचा हिशोब जनतेला मिळालाच पाहिजे. जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल,” असा इशारा जिल्हाध्यक्ष प्रा.प्रशांत देव्हारे यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!