Friday, August 14, 2026
Home Chandrapur चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांच्या हल्ल्यांचा प्रश्न मंत्रिमंडळापर्यंत ; ॲड. राजेंद्र महाडोळे यांनी केली...

चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांच्या हल्ल्यांचा प्रश्न मंत्रिमंडळापर्यंत ; ॲड. राजेंद्र महाडोळे यांनी केली ठोस मागणी.

0
15

चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांच्या हल्ल्यांचा प्रश्न मंत्रिमंडळापर्यंत ; ॲड. राजेंद्र महाडोळे यांनी केली ठोस मागणी.

सुकदर्शन वृतांत 
चंद्रपूर : (राजेंद्र वाढई – उपसंपादक) दि. ५ ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यात वाढत्या वाघांच्या हल्ल्यांमुळे शेकडो नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत.वाघांच्या सततच्या दहशतीमुळे अनेक गावांतील नागरिक स्थलांतर करण्यास भाग पडत आहेत. तसेच शेतकरी स्वतःची गुरेढोरे विकत असून भीतीच्या वातावरणामुळे शेती ओसाड पडत आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी घट होत आहे.
या गंभीर प्रश्नाची दखल घेत ॲड. राजेंद्र महाडोळे यांनी अखिल भारतीय समता परिषदेचे अध्यक्ष तथा राज्याचे मंत्री छगनरावजी भुजबळ यांची ३ ऑगस्ट २०२६ रोजी भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले होते.
या निवेदनाची दखल घेत ४ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत वाघांच्या हल्ल्यांचा विषय उपस्थित करण्यात आला. या बैठकीत वाघांचे हल्ले तातडीने रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याबाबत चर्चा झाली. तसेच वाघांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तींना त्वरित आर्थिक मदत, उपचारांची सुविधा आणि मृतांच्या कुटुंबीयांना तातडीची आर्थिक मदत व कुटुंबातील एका पात्र सदस्यास नोकरी देण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली.
वाघांच्या वाढत्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी शासकीय स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असून या प्रश्नाच्या कायमस्वरूपी तोडग्यासाठी लढा अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे ॲड.राजेंद्र महाडोळे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!