Thursday, July 30, 2026
Home Gadchiroli जेप्रा येथील पाण्याची टाकी सहा महिन्यांपासून बंद ; ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेबाबत नागरिकांत संताप. 

जेप्रा येथील पाण्याची टाकी सहा महिन्यांपासून बंद ; ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेबाबत नागरिकांत संताप. 

0
11

जेप्रा येथील पाण्याची टाकी सहा महिन्यांपासून बंद ; ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेबाबत नागरिकांत संताप. 

सुकदर्शन वृतांत 
गडचिरोली : जावई टोली,जेप्रा येथील पाण्याची टाकी गेल्या सहा महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. दीर्घकाळ लोटूनही टाकी सुरू करण्यासाठी किंवा दुरुस्तीबाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
यामुळे परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना दूरवरून पाणी आणावे लागत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.ग्रामपंचायतीने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन पाण्याची टाकी सुरू करावी.
तसेच नागरिकांना नियमित आणि स्वच्छ पाणीपुरवठा करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास संबंधित विभागाकडे तक्रार करून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!