Thursday, July 30, 2026
Home Gadchiroli जंगली प्राण्यांचा तातडीने कायमस्वरूपी बंदोबस्त करा ; अन्यथा जनआंदोलन छेडू. – गडचिरोली...

जंगली प्राण्यांचा तातडीने कायमस्वरूपी बंदोबस्त करा ; अन्यथा जनआंदोलन छेडू. – गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष विश्वजीत कोवासे

0
25

जंगली प्राण्यांचा तातडीने कायमस्वरूपी बंदोबस्त करा ; अन्यथा जनआंदोलन छेडू. – गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष विश्वजीत कोवासे

सुकदर्शन वृतांत 

गडचिरोली : दि.१० जुलै गडचिरोली जिल्ह्यात रानटी हत्ती, वाघ, रानडुक्कर तसेच इतर वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत आहे.वारंवार निवेदने, मोर्चे व आंदोलने करूनही या गंभीर प्रश्नावर प्रभावी व कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याने मानव – वन्यप्राणी संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे.
या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष विश्वजीत कोवासे यांच्या नेतृत्वाखाली मुख्य वनसंरक्षक कार्यालय,पोटेगाव रोड,गडचिरोली येथे मुख्य वनसंरक्षक नरेंद्र नरवने यांना निवेदन देऊन तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.नुकत्याच चांदाळा येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत सुमारे ३० वर्षीय युवकाचा रानटी हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त करत अशा घटना सातत्याने घडत असतील तर यापुढे आणखी किती निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागणार,असा संतप्त सवाल जिल्हाध्यक्ष विश्वजीत कोवासे यांनी उपस्थित केला.
निवेदनात म्हटले की रानटी हत्ती,वाघ,रानडुक्कर व इतर वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवावर तातडीने प्रभावी व कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली. तसेच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना किमान ₹ २५ लाखांची आर्थिक मदत तातडीने देण्यात यावी.मृत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र सदस्यास शासकीय सेवेत नोकरी द्यावी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक मनुष्यबळ, विशेष पथके, सुरक्षा उपाययोजना व प्रतिबंधात्मक यंत्रणा त्वरित कार्यान्वित कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी गटनेते तथा नगरसेवक सतीश विधाते, आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष माधवराव गावळ, ज्येष्ठ नेते प्रभाकर वासेकर,नंदू वाईलकर,अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन सेलचे जिल्हाध्यक्ष रुपेश टिकले युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, NSUI चे जिल्हाध्यक्ष राहुल वैरागडे, जितू मूनघाटे, विलास चीचगरे, हेमंत मोहितकर, हेमंत कोवासे, ओमप्रकाश चौधरी,निकेश कामीडवार,मिलिंद खोब्रागडे तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!