Friday, July 31, 2026
Home Breaking News एका चिप्सच्या पॅकेटमुळे बलात्काराच्या गुन्ह्याची उकल,AIची मदत अन्. 📍घटनास्थळापासून सुमारे 17 कि.मी.अंतरावरील...

एका चिप्सच्या पॅकेटमुळे बलात्काराच्या गुन्ह्याची उकल,AIची मदत अन्. 📍घटनास्थळापासून सुमारे 17 कि.मी.अंतरावरील बोखारा येथून आरोपीला अटक.

0
28

एका चिप्सच्या पॅकेटमुळे बलात्काराच्या गुन्ह्याची उकल,AIची मदत अन्.

📍घटनास्थळापासून सुमारे 17 कि.मी.अंतरावरील बोखारा येथून आरोपीला अटक.

सुकदर्शन वृतांत
नागपूर : बलात्कारानंतर झालेला खून, उष्णतेमुळे विद्रूप झालेला मृतदेह, मृत महिलेची न पटत असलेली ओळख, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचा अभाव आणि घटनास्थळी नसलेला ठोस पुरावा या मुळे रहस्यमय बनलेल्या खुनाचा गुंता अखेर नागपूर ग्रामीण पोलिसांनी 10 दिवसांच्या अथक तपासानंतर उलगडला.
अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), न्यायवैद्यक तपास आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याला बोखारा येथून अटक केली. पोलिसांनी अत्यंत बारकाईने केलेला हा तपास सुद्धा नाट्यमय ठरला आहे.विशेष म्हणजे घटनास्थळी एक देखील भक्कम पुरावा पोलिसांच्या हाती नव्हता.तरीही मृतदेहाजवळ पडलेल्या चिप्स पुड्याच्या पाकिटाचा छोटा तुकडा पोलिसांना मारेकऱ्यापर्यंत नेण्यात कामी आला.
जुन महिन्याच्या 27 तारखेला पाटणसावंगी शिवारात एक विमनस्क भिक्षेकरी महिला फिरत होती.सकाळी निर्जन स्थळी एका झुडपात तिचा मृतदेह आढळला.त्या मृतदेहाव एकही कपडा नव्हता.केवळ हातावर काही अक्षरे गोंदवलेली होती. शिवाय महिलेचा चेहरा देखील पूर्णतः विद्रुप झाला होता. आरोपीने प्रथम ज्येष्ठ महिलेवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला.अत्याचारामुळे महिलेच्या गुप्तांगाला गंभीर दुखापत झाली.
या जखमांमुळेच तिचा मृत्यू झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे महिलेचा ओळख पटवणे आधी पोलिसांसाठी सर्वांत मोठे आव्हान होते.या प्रकरणात पोलिसांनी पारंपरिक तपासासोबत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचीही मदत घेतली. घटनास्थळ परिसरातील तब्बल ५०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले.
शिवाय पोलिसांनी घटनेच्या वेळी परिसरात आढललेल्या ५२ हजार भ्रमणध्वनी क्रमांकांपैकी ५ हजार भ्रमणध्वनीवरच्या क्रमांकांशी झालेले संभाषण तपासले. यातही काहीही ठोस पोलिसांच्या हाती लागले नाही.
पोलिसांचे पथक घटनास्थळी सापडेल्या चिप्स पुड्याच्या तुकड्यावरून वितकाला बोलवले. त्याने हे चिप्स दहेगाव खापरखेडा भागात अधिक विकले जात असल्याचे सांगितले. दहेगाव जवळ एका सीसीटीव्ह सापडलेल्या संशयियावर पोलिसांची नजर गेली.एआयद्वारे तयार केलेल्या संशयिताच्या चेहऱ्याची 17 किलोमीटर परिघातील माहितीशी पडताळणी करण्यात आली.
अखेर हा फोटो एका संशयिताशी जुळल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळापासून सुमारे १७ किलोमीटर अंतरावरील बोखारा येथून सुधाकर दादाराव मंडपे (४८) याला अटक केली.धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी ज्येष्ठ महिलेवर केलेल्या बलात्कार आणि खून प्रकरणात पोलिसांनी अटक केली.
सुधाकर मंडपे याने २० वर्षांपूर्वी देखील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे पोलिसांना तपासात आढळले.कळमेश्वर पोलीस ठाण्यत त्याच्यावर याचा गुन्हा दाखल आहे.ग्रामीण पोलिसांनी यापूर्वीही मार्वल तंत्रज्ञानातून गुंतागुंतीच्या प्रकरणात तपास केला आहे.
त्याची दखल घेत नवी दिल्ली, राजसथान, आंध्र प्रदेश, गुजरात गृहमंत्रालयाने नागपूर ग्रामीण पोलिसांकडे मदत मागितली आहे. भविष्यात विज्ञानावर आधारित आधुनिक तंत्रज्ञान तपास यंत्रणेला आणखी सक्षम करेल,असे हर्ष पोद्दार,(पोलीस अधिक्षक, नागपूर ग्रामीण) म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!