Friday, July 31, 2026
Home Breaking News आरमोरी तहसील कार्यालयामागे ६५ वर्षीय वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या.

आरमोरी तहसील कार्यालयामागे ६५ वर्षीय वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या.

0
24

आरमोरी तहसील कार्यालयामागे ६५ वर्षीय वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या.

सुकदर्शन वृतांत
आरमोरी : आरमोरी शहरातील तहसीलदार कार्यालयाच्या मागील परिसरात आज सकाळी एका ६५ वर्षीय वृद्धाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मनोहर किसन नंदनवार वय,६५ वर्ष असे मृतकाचे नाव असून ते आदिवासी मुलांच्या वस्तीगृहाजवळ वास्तव्यास होते.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ६ ते ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मनोहर नंदनवार यांनी तहसीलदार कार्यालयामागील परिसरात गळफास घेतल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती आरमोरी पोलिसांना दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे. मनोहर नंदनवार यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!