Saturday, September 12, 2026
Home Chandrapur नागभीड च्या विजय दैवलकरचे जागतिक स्पर्धेत २ सुवर्ण पदक ; हलाखीच्या परिस्थितीतून...

नागभीड च्या विजय दैवलकरचे जागतिक स्पर्धेत २ सुवर्ण पदक ; हलाखीच्या परिस्थितीतून सुवर्ण यश

नागभीड च्या विजय दैवलकरचे जागतिक स्पर्धेत २ सुवर्ण पदक ; हलाखीच्या परिस्थितीतून सुवर्ण यश

सुकदर्शन वृतांत 
नागभीड : किर्गिस्तान येथे आयोजित करण्यात आलेल्या १३ व्या वर्ल्ड सिनियर-ज्युनिअर स्ट्रेंथ लिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये नागभीड च्या विजय संजय दैवलकर याने भारताचा तिरंगा दिमाखात फडकवला आहे. ६८ किलो वजनी गटात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना विजयने वर्ल्ड स्ट्रेंथ लिफ्टिंग आणि इन्क्लाइन बेंच प्रेस चॅम्पियनशिप अशा दोन्ही प्रकारांत दोन सुवर्ण पदके (Gold Medals) पटकावून जागतिक स्तरावर देशाचे नाव उंचावले आहे.
८ ते १२ सप्टेंबर दरम्यान आयोजित या जागतिक स्पर्धेत जगभरातील नामांकित खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या कडक स्पर्धेत विजयने आपल्या कौशल्याच्या आणि ताकदीच्या जोरावर दुहेरी सुवर्ण यश मिळवले. या ऐतिहासिक कामगिरीमुळे सध्या संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 ” के.के.फिटनेस ” मध्ये घ्यायचा सरावाचे धडे ; प्रशिक्षकांकडून कौतुक

विजयने या स्पर्धेसाठी ” के.के.फिटनेस ”  जिममध्ये अत्यंत कठोर सराव केला. त्याचे प्रशिक्षक शुभम सुरपाम यांनी विजयच्या या अभूतपूर्व यशाबद्दल त्याचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत. ” विजय अत्यंत मेहनती मुलगा आहे.
तो आपली घरची व वैयक्तिक जबाबदारी सांभाळून दररोज न चुकता सराव करायचा,म्हणूनच आज तो हे यश गाठू शकला आहे. पुढेही तो देशाकरिता अशीच उत्कृष्ट कामगिरी करत राहील,” असा दृढ विश्वास प्रशिक्षक शुभम सुरपाम यांनी व्यक्त केला.
 विजयचे हे यश केवळ एक पदक नसून, त्याच्या कठोर संघर्षाची कहाणी आहे. वडिलांचे छत्र हरपलेले असताना आणि घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत तंग असतानाही विजयने आपली जिद्द सोडली नाही.या जागतिक स्पर्धेत भाग घेण्यासाठी त्याने चक्क बँकेचे कर्ज (लोन) काढले आणि किर्गिस्तान गाठले. स्वतःच्या अफाट मेहनतीवर आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्याने या गरिबीवर मात करत देशाला सुवर्णक्षण मिळवून दिले.
विजय सारख्या प्रतिभावान खेळाडूंना जर योग्य वेळी स्पॉन्सरशिप मिळाली, तर ते भविष्यात देशासाठी आणखी मोठे गौरवशाली काम करू शकतात.
error: Content is protected !!