Monday, September 14, 2026
Home Chandrapur तळोदी बा.बाळापूर येथे कृष्ण जन्माष्टमी चा कार्यक्रम उत्साहात संपन्न

तळोदी बा.बाळापूर येथे कृष्ण जन्माष्टमी चा कार्यक्रम उत्साहात संपन्न

तळोदी बा.बाळापूर येथे कृष्ण जन्माष्टमी चा कार्यक्रम उत्साहात संपन्न

सुकदर्शन वृतांत 
नागभीड : दि.६/९/२०२६ रोज रविवारला श्री.विठ्ठल मंदिरात कृष्णजन्माष्टमी चा कार्यक्रम अतिशय भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.याप्रसंगी आदरणीय ह भ. प.माऊली सौ.सविताताई खरवडे ब्रह्मपुरी यांचे किर्तन ,व राधाकृष्ण वेशभूषा दहीहंडीचे आयोजन केल्या गेले होते.
वेशभूषेतील मुलांना विशेष बक्षीस व दहीहंडी फोडून गोपाल काला वाटप करण्यात आला. चातुर्मास समिती ब्रह्मपुरी च्या वतीने आदरणीय सविता ताई खरवडे यांनी बाल तबला वादक स्वानंद विक्रम चुटे याला कौतुकाची थाप देत, व ह भ प वैशालीताई लांजेवार यांचा मनोज भाऊ वटे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच तळोधी वासीय भाविकांकडून जय दुर्गा महिला भजन मंडळ तळोधी बा.यांना मानधन व श्रीफळ देऊन मा.उज्वलाताई जयस्वाल यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास तळोदि वासीय भाविकांचा मोठ्या प्रमाणात उस्फूर्त प्रतिसाद लाभला होता.
श्री सुनील दादा जयस्वाल,गंगाधर दादा पाकमोडे,विजू दादा करंडे, बाबा भाऊ लोणबले,श्रीरामदादा मोटघरे, लक्ष्मण दादा लोणबले, जीवेस दादा सयाम, विकी दादा भेंडाळे,मा.उज्वलाताई जयस्वाल,दुर्गाताई गुरनूले , सौ पुष्पलताताई बोरकर, संजीवनी ताई वाडई, संगीता ताई हजारे
सौ मालताताई लोणबले,भावनाताई कात्यायन, सुवर्णाताई वाराणशीवार,स्नेहा ताई संगमवार, संगीता ताई चुटे, माधुरीताई शेंडे, रोशनी गज्जलवार यांनी विशेष कार्यभार सांभाळला. कृष्ण जन्माचा सर्व भक्तांनी श्रद्धायुक्त भावनेनी अगदी मनसोक्त आनंद लुटला.
error: Content is protected !!