वृद्ध कलाकार अशोक करंडे शासनाच्या मानधनापासून वंचित
सुकदर्शन वृतांत
ब्रम्हपुरी- ०८/०९/२६ (अमरदीप लोखंडे – सहसंपादक)बालवयापासून कलेची आवड असलेले ब्रह्मपुरी तालुक्यातील अ-हेरनवरगांव येथील सुमधुर गायक, वृद्ध कलाकार अशोक भीमदास करंडे वय वर्ष ६५ हे शासनाच्या कलाकार योजनेच्या मानधनापासून अजूनही वंचित आहेत.
अशोक करंडे गुरुदेव सेवा मंडळात भजन, कीर्तन सुरेल आवाजात गातात.टाळ, हार्मोनियम व इतरवाद्य वाजविणे , सामुदायिक प्रार्थना, भागवत, नाटकामध्ये स्त्रीचे काम व अन्य पात्र ,समाज प्रबोधन ,व्यसनमुक्ती, ग्राम स्वच्छता अभियान , यामध्ये स्वयंस्फूर्तीने हिरीरीने भाग घेऊन काम करायचे.कलाकार मानधन मिळावे म्हणून दि.१०/०६/२४ ला तीन प्रती मध्ये पंचायत समिती ब्रह्मपुरी येथे अर्ज सादर केला .
काही दिवसांनी पंचायत समिती कार्यालयाकडून मिळालेल्या सूचनेनुसार त्यांनी ऑनलाइनअर्ज केला. परंतु आजपर्यंत शासनाने त्याच्या अर्जाला केराची टोपली समजून त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ते शासनाच्या कलाकार योजनेपासून आजतागायत वंचित राहिले आहेत.
लकवा ग्रस्त, बीपी, शुगर चा रुग्ण असलेल्या अशोक करंडेच्या अर्जाची दखल घेऊन शासनाने त्वरित मानधन द्यावे असे कळकळीचे आवाहन त्यांनी शासनाला केले आहे.
error: Content is protected !!