Monday, September 14, 2026
Home Chandrapur डॉ.अतुल येरपुडे यांना ” सुवर्ण विद्यारत्न ” सन्मान प्रदान

डॉ.अतुल येरपुडे यांना ” सुवर्ण विद्यारत्न ” सन्मान प्रदान

डॉ.अतुल येरपुडे यांना ” सुवर्ण विद्यारत्न ” सन्मान प्रदान

सुकदर्शन वृतांत 
ब्रह्मपुरी : (अमरदीप लोखंडे – सहसंपादक) येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाचे प्रा.डॉ.अतुल नत्थूजी येरपुडे यांना महाराष्ट्र स्वर्णकार संस्था, नागपूरतर्फे मानाचा ‘सुवर्ण विद्यारत्न सन्मान’ नुकताच प्रदान करून त्यांना गौरविण्यात आले.
नागपूर येथे आयोजित या दिमाखदार सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजय भेंडे,नागपूर हे उपस्थित होते.याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.पुरुषोत्तम कावळे, नियोजित अध्यक्ष श्री.विलासजी बांगरे,महासचिव श्री.अनिल मालोकार आणि श्री.प्रशांत गुरव हे मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
या मान्यवरांच्या हस्ते डॉ.येरपुडे यांना शाल, श्रीफळ,सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.शिक्षण व संशोधन क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.याआधी संशोधन कार्यासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्रीमती स्नेहलताबाई भैया, सचिव अशोक भैया,प्राचार्य डॉ.सुभाष शेकोकर,डॉ. धनराज खानोरकर,प्राध्यापक वृंद यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
error: Content is protected !!