Thursday, July 30, 2026
Home Chandrapur जंतर – मंतर येथील घटनेच्या निषेधार्थ सिंदेवाही बंद ; निवेदनाद्वारे राज्यपालांकडे कारवाईची...

जंतर – मंतर येथील घटनेच्या निषेधार्थ सिंदेवाही बंद ; निवेदनाद्वारे राज्यपालांकडे कारवाईची मागणी. 📍बहुजन युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष समीरभाऊ सहारे आणि सामाजिक कार्यकर्ते तथा वंचित बहुजन आघाडीचे सिंदेवाही शहराध्यक्ष सूर्यजितभाऊ खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पाडले.

0
19

जंतर – मंतर येथील घटनेच्या निषेधार्थ सिंदेवाही बंद ; निवेदनाद्वारे राज्यपालांकडे कारवाईची मागणी.

📍बहुजन युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष समीरभाऊ सहारे आणि सामाजिक कार्यकर्ते तथा वंचित बहुजन आघाडीचे सिंदेवाही शहराध्यक्ष सूर्यजितभाऊ खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पाडले.

सुकदर्शन वृतांत 
सिंदेवाही, दि. 23 जुलै : दिल्लीतील जंतर-मंतर येथे घडलेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ आज सिंदेवाही येथे तालुकास्तरीय बंदचे आयोजन करण्यात आले. बहुजन युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष समीरभाऊ सहारे आणि सामाजिक कार्यकर्ते तथा वंचित बहुजन आघाडीचे सिंदेवाही शहराध्यक्ष सूर्यजितभाऊ खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.
या बंद आंदोलनाला सिंदेवाही तालुक्यातील आंबेडकरी युवक-युवती, महिला तसेच विविध सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आंदोलनादरम्यान निषेधाच्या घोषणा देत संबंधित घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.यानंतर आंदोलनकर्त्यांनी आपल्या प्रमुख मागण्यांचे निवेदन सिंदेवाही तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल यांना सादर केले.
संबंधित घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी आशिष सहारे,शुभांगी खोब्रागडे,प्राजक्ता खोब्रागडे, शिल्पा खोब्रागडे, सुजल राऊत, संयुग ब्राम्हणे, आदित्य जनबंधु, अरमान जनबंधु,पियुष देठे,रोशन लोणारे, सुशील वाघमारे, उमेश मामीडवार
प्रविण नागदेवते, गौतम नागदेवते, रक्षित माटे, रोहित शिंपी, प्रज्योत नागदेवते, सलिल नागदेवते, अखिल गजभिये, सुजल खोब्रागडे, मंदा भैसारे, नलिनी रामटेके, विमित दहीवले, अभिषेक साखरे, कविश कोवले, सम्यक नागदेवते, प्रिन्स नागदेवते, रेहान पोपटे, विनोद डांगे, सचिन बन्सोड, मनोज मेश्राम, विलास घोनमोडे, हर्ष खोब्रागडे, सुजल जनबंधु, मुखरु बन्सोड, महेंद्र कोवले, तेजस डोंगरे आणि नंदू खोब्रागडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!