Home Chandrapur प्राथमिक आरोग्य केंद्र,अ-हेरनवरगांव नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न.
प्राथमिक आरोग्य केंद्र,अ-हेरनवरगांव नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा संपन्न.
सुकदर्शन वृतांत
ब्रम्हपुरी – २२/०७/२६ (अमरदीप लोखंडे – सहसंपादक) ब्रह्मपुरी तालुक्यातील अ-हेरनवरगांव येथील सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन,आरोग्य विभाग जिल्हा परिषद ,चंद्रपुर आयुष्यमान आरोग्य मंदिर आरोग्य परम् धनम् -प्राथमिक आरोग्य केंद्र नवीन इमारत लोकार्पण सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. या सोहळ्याचे उद्घाटन डॉक्टर सतीश वार्जूरकर यांनी कृष्णा भाऊ सहारे उपाध्यक्ष माजी जिल्हा परिषद चंद्रपुर यांच्या अध्यक्षतेखाली हित कापून केले.
प्रमुख अतिथी म्हणून क्षीरसागर मॅडम मुख्य कार्यपालन अधिकारी, चंद्रपुर,डॉ अशोक कटारे जिल्हा आरोग्य अधिकारी, चंद्रपुर, दीनदयाल मटाले कार्यकारी अभियंता, चंद्रपुर, तुषार दांडगे बिडीओ पंचायत समिती, ब्रह्मपुरी , शेळके मॅडम, दोनाडकर पिंपळगाव भोसले विलास ऊरकुडे, सुरेश दुनेदार सरपंच , पिंपळगाव भोसले, बांडे सरपंच नांदगाव जाणी, नागोराव पिलारे हरदोली,श्रीकांत पिलारे सदस्य,रवी मेश्राम माजी सभापती, उमाजी कुथे, डॉ सहारे, डॉ मनाली फटिंग पी.एच.सी. अ-हेरनवरगांव व्यासपीठावर उपस्थित होते.
वंदना मेश्राम ,नयना क-हाडे, जोस्त्ना ठोंबरे, शितल दिघोरे या आशा वर्कर नी एस पी व्ही इंजेक्शनची जनजागृती करण्या संबंधाने केलेले पथनाट्य आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.सर्व उपस्थितांनी मन भरून या पथनाट्याचे कौतुक केले.
या कार्यक्रमाकरिता ब्रह्मपुरी तालुक्याच्या मुडझा, आवळगांव या शेवटच्या टोकापासूनच्या आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अ-हेरनवरगांव आरोग्य केंद्रातील जवळपास पंधरा गावातील आरोग्य कर्मचारी,परिचारिका,आशा वर्कर यांनी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे संचालन व आभार डॉ.सुखदेवे मॅम यांनी पार पाडले.
error: Content is protected !!