Home Breaking News गडचिरोली पोलीसांनी केला अवैध दारु व चारचाकी वाहनासह एकूण 11,05,800/- रुपयांचा मुद्देमाल...
गडचिरोली पोलीसांनी केला अवैध दारु व चारचाकी वाहनासह एकूण 11,05,800/- रुपयांचा मुद्देमाल जप्त
सुकदर्शन वृतांत
गडचिरोली : (दिनांक,19/06/2026) गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक करण्याचा प्रयत्न केला जात असतो. त्याविरुध्द पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश यांचे अवैध दारु विक्री करणायांवर प्रभावीपणे कायदेशिर कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत.
यावरुन आज दिनांक,19/06/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली येथील पथकाने उपपोस्टे पेंढरी हद्दीत सापळा रचून अवैद्य दारूची वाहतुक करणाया आरोपीविरुध्द कारवाई केलेली आहे.सविस्तर वृत असे आहे की, आज दिनांक 19/06/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व अंमलदार यांना गोपनिय बातमीदाराकडून माहिती मिळाली.
इसम नामे लखन जोहारी भैसा,वय 40 वर्ष रा. बेडगाव ता.कोरची जि.गडचिरोली हा आपल्या साथीदाच्या मदतीने पांढया रंगाच्या चारचाकी स्कॉर्पिओ वाहन क्र.सी.जी 08 ए.आर 5976 या वाहनाने मौजा मंगेवाडा मार्गाने अवैधरित्या देशी-विदेशी दारुची वाहतुक करुन उपपोस्टे पेंढरी हद्दीतील चिल्लर विक्रेत्यांना पुरवठा करणार आहेत.
यावरून सदर पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मौजा मंगेवाडा ते पेंढरी गावाकडे जाणाया रस्त्यावर दोन पंचासह सापळा रचला. यावेळी पोलीस पथकास मिळालेल्या माहिती प्रमाणे चारचाकी स्कॉर्पिओ वाहन क्र.सी.जी 08 ए.आर 5976 येत असताना दिसून आल्याने पोलीस पथकाने अडथळा निर्माण करून वाहनास थंाबण्याचा ईशारा केला.
परंतु सदर वाहन चालकाने यावेळी वाहन रत्याच्या कडेला थांबविल्यानंतर वाहनचालकाच्या बाजूला बसलेले इसम पोलीस पथकास पाहून शेतशिवाराचा व अंधाराचा फायदा घेत पळून गेले. यानंतर सदर वाहन चालकास त्याचे नाव विचारले असता, त्याने आपले नाव लखन जोहारी भैसा, वय 40 वर्ष रा. बेडगाव, ता. कोरची, जि. गडचिरोली असे सांगितले.
यानंतर पोलीस पथकाने सदर वाहनाची तपासणी केली असता, चारचाकी वाहनामध्ये
1) 180 मिली मापाचे रॉयल स्टॅग विस्की 96 नग एकूण किंमत 28,800/- रुपये
2) 500 मिली मापाचे माऊंट 6,000 बियर 480 नग एकूण किंमत 1,44,000/- रुपये,
3) 500 मिली मापाचे लेमऊंट बिअर कंपनीचे 318 नग एकूण किंमत 95,000/- रुपये,
4) मॅक डॉवेल्स नंबर वन रिझर्व व्हिस्की ओरिजनल कंपनीचे 750 मिली मापाचे 48 नग एकूण किंमत 48,000/- रुपये
5) 80 मिली मापाचे गोवा विस्की 300 नग एकूण किंमत 60,000/- रुपये
6) मॅक डॉवेल्स नंबर वन रिझर्व व्हिस्की ओरिजनल कंपनीचे 180 मिली मापाचे 96 नग एकूण किंमत 28,000/- रुपये,
7) चारचाकी महिंद्रा स्कॉर्पिओ वाहन किंमत 7,00,000/- रुपये असा एकूण 11,05,800/- रुपयाचा मुद्देमाल घटनास्थळावरुन जप्त करण्यात आला.
संबंधीत घटनेच्या अनुषंगाने उपपोस्टे पेंढरी येथे दिलेल्या तक्रारीवरुन अप क्र. 31/2026 कलम 65 (अ), 83 म.दा.का.अन्वये
आरोपी नामे
1) लखन जोहारी भैसा,वय,40 वर्ष रा.बेडगाव ता. कोरची जि.गडचिरोली तसेच
फरार आरोपी : –
2) निर्मल धमगाये
3) तरुण धमगाये, दोघेही रा.कोरची ता.कोरची जि. गडचिरोली यांचे विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्रातील फरार आरोपींचा शोध घेणे सुरु असून, गुन्ह्राचा पुढील तपास पोउपनि. शुभम जाधव, उपपोस्टे पेंढरी हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री.एम.रमेश,अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री.कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री.गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोलीचे प्रभारी अधिकारी पोनि.श्री.अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात सपोनि.भगतसिंग दुलत,पोअं/प्रशांत गरफडे,सचिन घुबडे,चापोअं/दिपक लोणारे यांनी पार पाडली.
error: Content is protected !!