Home Chandrapur राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त मार्गदर्शन व पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न.
राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त मार्गदर्शन व पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न.
सुकदर्शन वृतांत
ब्रह्मपुरी – ०६ /०७/२६ (अमरदीप लोखंडे – सहसंपादक) डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था, चांदा (ब्रह्मपुरी)च्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त मार्गदर्शनपर कार्यक्रम व पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्थेचे सचिव तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स ब्रम्हपुरीचे प्राचार्य डॉ. देवेश कांबळे तर कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व प्रकाशक म्हणून ज्येष्ठ लेखक, विचारवंत तथा शिवराज विद्या संकुल, गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूरचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे पाटील
सौ क्रांतिदेवी कुराडे, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश कांबळे, ब्रह्मपुरीचे नगराध्यक्ष योगेशजी मिसार, बहुजन विचार मंच, ब्रह्मपुरीचे प्रा. संजय मगर, संध्येच्या सदस्या तथा ब्रह्मपुरी पब्लिक स्कूलच्या प्राचार्या सौ. रिमा कांबळे, संस्थेच्या सदस्या तथा महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा.डॉ.स्निग्धा कांबळे
अनिताताई रामटेके, राजकुमारजी शेंडे, ब्रम्हपुरीचे विद्यमान नगरसेवक मोंटूभाऊ पिल्लारे, पुष्पांकर बांगरे, तथा विद्यमान नगरसेविका सपना बल्लारपुरे, माधुरी उपासे, रेणुताई ठेंगरी, रंजनाताई बुराडे, जयश्रीताई भुते, हेमलता सिंहगडे, पुष्पलता पोपटे विचारमंचावर उपस्थित होते.
डॉ.देवेश कांबळे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात राजर्षी शाहू महाराज यांच्या आरक्षण धोरणाविषयी भाष्य करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात त्यांच्या धोरणांना मूर्त रूप कसे दिले यावर सविस्तर विवेचन केले.प्रा.संजय मगर यांनी आपल्या मार्गदर्शनात राजश्री छत्रपती शाहू महाराज तथा तमाम परिवर्तनवादी बहुजन विचारवंतांच्या कार्य आणि विचारांचा वारसा घेऊन सांप्रत लयाला गेलेली सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी बुद्धिजीवी वर्गाने आपापसातील भेद दूर करून एकजुटीने प्रतिगामी शक्तीशी दोन हात करण्याचे आवाहन केले.
प्रा.किसनराव कुराडे पाटील यांनी आपल्या संबोधनात अगदी कमी वयात दर्जेदार लेखनकार्यास सुरुवात केल्याबद्दल आदित्य बोरकरचे तथा त्याला वेळोवेळी प्रोत्साहन देऊन प्रेरित केल्याबद्दल डॉ. देवेश कांबळे यांचे भरभरून कौतुक केले आणि लेखन प्रपंच असाच अखंडित सुरू ठेवण्याची सूचना केली.
या प्रसंगी संस्थेच्या वतीने प्रा. किसनराव कुराडे, योगेश मिसार, प्रा. संजय मगर यांचा शाल, सन्मानचिन्ह तथा पुष्पगुच्छ देऊन संस्थेचे सचिव डॉ देवेश कांबळे तथा अध्यक्ष डॉ. राजेश कांबळे यांनी यथोचित सत्कार केला.कार्यक्रमाला गडहिंग्लज, कोल्हापूरवरून विशेषत्वाने उपस्थित असलेल्या सौ क्रांतिदेवी कुराडे, सौ. सोनाली जगताप, सौ. गीता साळोखे, सुरेश जगताप, अनिल कलकुटकी यांचा देखील संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
प्रा.किसनराव कुराडे यांनी नवोदित लेखन कार्यास विशेष प्रोत्साहन केल्याबद्दल प्राचार्य डॉ. देवेश कांबळे तर लेखन कार्यासाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी आदित्य बोरकर, तेजस चांदेकर, अखिलेश साहारे यांचा शाल, पुष्पगुच्छ तथा मानपत्र देऊन सत्कार केला. तद्वतच सौ.क्रांतीदेवी कुराडे यांनी मातृसन्मान म्हणून सौ.रिमा कांबळे, डॉ. स्निग्धा कांबळे, अनिताताई रामटेके, शालुताई बोरकर यांना सन्मानित केले.
या सोहळ्यात महाविद्यालयाचा विद्यार्थी युवा लेखक आदित्य राजकुमार बोरकर लिखित “भारतातील गुलामगिरी : काल, आज, उद्या” या ग्रंथाचे प्रकाशन प्रा . किसनराव कुराडे, डॉ. देवेश कांबळे तथा विचारमचावरील सर्व मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाचे संचालन प्रा.तुफान अवताडे व प्रा. वसुधा देवगडे यांनी तर आभार प्रा. डॉ. स्निग्धा कांबळे यांनी मानले.
या कार्यक्रमास संस्थेद्वारा संचालित डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स, ब्रम्हपुरी, डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे शिक्षण महाविद्यालय, मीराबाई कांबळे नर्सिंग कॉलेज, ब्रम्हपुरी पब्लिक स्कूल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर डी फॉर्म., बी.फॉर्म कॉलेज येथील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार,साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
error: Content is protected !!