Monday, September 14, 2026
Home Breaking News गडचिरोली शहरात नंदनवननगर परिसरात एका युवकाचा स्कॉर्पिओ वाहनात वैद्यकीय महाविद्यालयाच्या पर्यवेक्षकाचा मृतदेह...

गडचिरोली शहरात नंदनवननगर परिसरात एका युवकाचा स्कॉर्पिओ वाहनात वैद्यकीय महाविद्यालयाच्या पर्यवेक्षकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ

गडचिरोली शहरात नंदनवननगर परिसरात एका युवकाचा स्कॉर्पिओ वाहनात वैद्यकीय महाविद्यालयाच्या पर्यवेक्षकाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ

सुकदर्शन वृतांत 
गडचिरोली : शहरातील चामोर्शी मार्गावरील नंदनवननगर परिसरात एका युवकाचा मित्राच्या स्कॉर्पिओ वाहनात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. केतन पोचमपल्लीवार वय,33 वर्ष रा.मूल,जि.चंद्रपूर) असे मृत युवकाचे नाव असून,ते गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पर्यवेक्षक म्हणून कार्यरत होते.
मिळालेल्या माहितीनुसार,केतन हे शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घरातील सदस्यांना बाहेर जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले होते. मात्र, त्यानंतर ते घरी परतले नाहीत. रविवारी (दि.6) दुपारी साडेबाराच्या सुमारास नंदनवननगर परिसरात (MH.33 AC 4684 क्रमांक च्या स्कॉर्पिओ मध्ये ते पुढील प्रवासी आसनावर बसलेल्या अवस्थेत आढळून आले.
त्यांच्या नाकातून व तोंडातून फेसासारखा पदार्थ बाहेर येत असल्याचे दिसून आले.कोणतीही हालचाल जाणवत नसल्याने त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र,वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
याप्रकरणी मृताच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
केतन हे शहरालगतच्या नवेगाव परिसरात भाड्याच्या घरात राहत होते. त्यांच्या निवासस्थानापासून मृतदेह आढळलेल्या ठिकाणाचे अंतर सुमारे पाच किलोमीटर आहे. त्यामुळे ते वाहनापर्यंत कसे पोहोचले आणि मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. 
मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिस तपासानंतर या घटनेमागील वस्तुस्थिती समोर येण्याची शक्यता आहे.
error: Content is protected !!