Monday, September 14, 2026
Home Education महात्मा गांधी नगर परिषद प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत ; प्रवेशोत्सव...

महात्मा गांधी नगर परिषद प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत ; प्रवेशोत्सव व शाळापूर्व तयारी मेळावा संपन्न.

महात्मा गांधी नगर परिषद प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत ; प्रवेशोत्सव व शाळापूर्व तयारी मेळावा संपन्न.

सुरेश कन्नमवार – मुख्य संपादक (सुकदर्शन वृतांत)
गडचिरोली : शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी महात्मा गांधी नगर परिषद प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रवेशोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन, त्यांच्या दोन्ही पायांचे ठसे घेऊन तसेच सेल्फी काढून आनंददायी वातावरणात स्वागत करण्यात आले.
यावेळी इयत्ता पहिलीतील विद्यार्थ्यांसाठी शाळापूर्व तयारी मेळावा–२ आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक तयारीचे विविध पैलू तपासण्यात आले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेशाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास नगरसेविका खेवले ताई, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ.प्रीती भांडारकर,समितीचे सदस्य, पालक, नवागत विद्यार्थी तसेच सर्व वर्गांतील विद्यार्थी उपस्थित होते.शाळेचे मुख्याध्यापक श्री.बनसोड सर यांच्या मार्गदर्शनाखाली राजगडे मॅडम,गेडाम सर, शिंगाडे सर व दरडमारे मॅडम यांनी कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वी आयोजन केले.
शाळेच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना गोड जेवण म्हणून जिलेबीचे वाटप करण्यात आले. तसेच शिक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी शाळेच्या विद्यार्थ्यांची वार्डातून उत्साहपूर्ण रॅली काढण्यात आली.या उपक्रमामुळे परिसरात शाळेविषयी सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून नवागत विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
error: Content is protected !!