Home Chandrapur 8 तासाऐवजी 12 तास नियमित वीज पुरवठा सुरू ठेवण्यासाठी अभियंत्यास दिले निवेदन.
8 तासाऐवजी 12 तास नियमित वीज पुरवठा सुरू ठेवण्यासाठी अभियंत्यास दिले निवेदन.
सुकदर्शन वृतांत
ब्रह्मपुरी : (अमरदीप लोखंडे – सहसंपादक) दि,30/06/2026 ब्रह्मपुरी तालुक्यातील अ-हेरनवरगांव येथील शेतकऱ्यांनी लहरी पावसाच्या कोसळणाऱ्या सरीचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन कृषी पंपाचा १२ तास सतत सुरू असलेला वीज पुरवठा ऐन शेती हंगामाच्या वेळेस वीज वितरण कंपनीने आठ तास केल्यामुळे शेती हंगाम करण्यास धानप-यांना पाणी देणे, रोवणी करणे, आवत्याधानास पाणी, देणे भाजीपाल्यास पाणी देणे अपुरे पडत असल्यामुळे शेती हंगाम खोडंबल्या जात आहे.
त्यामुळे ब्रह्मपुरी तालुका शेतकरी सल्लागार समिती अध्यक्ष वामन मिसार या शेतकऱ्यांच्या नेतृत्वात वीज वितरण कंपनी कार्यालय ब्रह्मपुरीचे कार्यकारी अभियंता यांना सध्या देण्यात येत असलेली आठ तास कृषी पंपाची वीज बंद करून ती बारा तास सतत सुरू ठेवण्यासाठी चे निवेदन देऊन शेतकऱ्यांची होणारी गडचेपी थांबविण्याची विनंती केली.सदर निवेदन देताना ईश्वर कुथे,पुरुषोत्तम जीभकाटे, ज्ञानेश्वर, देवढगले,राजेंद्र ठेंगरे,अशोक उरकुडे, संजय टेंभुरकार व अन्य शेतकरी उपस्थित होते.
error: Content is protected !!